‘कसबा’ पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे विरोधकांना पत्र

0

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधकांना पत्र दिले आहे.भाजपच्या या आवाहनाला विरोधक कशा प्रकारे प्रतिसाद  देणार हे आता लवकरच स्पष्ट होईल.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी आद्यपही भाजप आणि महविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची अपेक्षा आहे. भाजपने हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी  आता अधिकृत प्रयत्न सुरु केले आहेत. जगदीश मुळीक यांनी राजकीय पक्षांना पात्र दिले आहे.
महाराष्ट्राची अशी वैशिष्ट्यपूर्ण राजकीय संस्कृती आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपला पक्षनिवेश बाजूला ठेवून परस्परांशी उत्तम संबंध प्रस्थपित करतात. विकासकामात कधीच राजकारण येऊ देत नाहीत.  निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सर्वामनुमते बिनविरोध निवडणूक केली जाते. राज्याची हि वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी भाजपनं नेहमीच सकरात्मक भूमिका घेतली. अंधेरी पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नाही. राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनांनंतर जाहीर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विरोधकांच्या विंनतीला मान देत उमेदवार न देता बिनविरोध निवडणूक केली होती. त्याचप्रकारे कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी. मुक्त टिळक यांना तीच खाई श्रद्धांजली ठरेल असा महत्वपूर्ण मजकूर जगदीश मुळीक यांनी पात्रात नमूद केला आहे.
Leave a comment