पुण्यात आजपासून बूस्टर डोसला सुरुवात… फ्रंटलाईन वर्कर, तसेच 60 वर्षे वयोगटाच्या नागरिकांना बूस्टर डोसची सुविधा

पुण्यात आज पासून कोरोनावरील बूस्टर डोसला सुरुवात झाली आहे. शहरातील १७९ लसीकरण केंद्रात हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. कोरोना काळात आपली जबाबदारी सांभाळणारे फ्रंटलाईन वर्कर यासोबतच ६० वर्षे वयोगटाच्या नागरिकांना या बूस्टर डोसची सुविधा दिली जाणार आहे.
ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यावर हा बूस्टर डोस अतिशय उपयुक्त ठरणार असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुणे शहरातील ज्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु आहे अशा लसीकरण केंद्रांवर तसेच सरकारी रुग्णालये येथे हा बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आला आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे कि, सोमवारपासून १७९ केंद्रांवर ‘प्रिकॉशन डोस’ उपलब्ध !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार आपल्या पुणे महापालिकेच्या सर्व केंद्रावर आज पासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवर २५ टक्के डोस यासाठी राखीव असणार आहेत. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी ग्रस्तांना हा दोस दिला जाईल. दुसऱ्या डोसनंतर ३९ आठवड्यांचा कालावधी झालेले नागरीक यास पात्र असतील, अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे.
सोमवारपासून १७९ केंद्रांवर 'प्रिकॉशन डोस' उपलब्ध !
पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांनी केलेल्या घोषणेनुसार आपल्या पुणे महापालिकेच्या सर्व केंद्रावर उद्यापासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवर २५ टक्के डोस यासाठी राखीव असणार आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 9, 2022
बूस्टर डोससाठी नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. खासगी केंद्रात लास घ्यावयाची असली तरीही सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतरच खासगी केंद्रावर लास घेण्यास परवानगी असेल. सहव्याधी असलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही.