जागतिक तंत्रज्ञान दिवसानिमित्त पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने संगणक साक्षरता अभियानाची सुरुवात!

0

पुणे: जागतिक तंत्रज्ञान दिवसानिमित्त आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने युवती व महिलांसाठी संगणक साक्षरता अभियानाचे उद्घाटन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.रमेशदादा बागवे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.मोहनदादा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

या अभिनयाचे प्रास्ताविक करताना पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.पूजा मनिष आनंद म्हणाल्या, ‘संगणक साक्षरता अभियान हा पुणे शहर महिला काँग्रेसचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. हा प्रकल्प एक महिना चालणार असून या प्रकल्पा अंतर्गत युवती व महिलांना एमएस ऑफिस, डिजिटल मार्केटिंग व सॉफ्ट स्किल चे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांना कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. स्व.राजीव गांधी यांनी भारतासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे द्वार खुले केले होते. त्यांचे स्मरण म्हणून हा महत्वकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवती व महिला कुठेही मागे राहू नये. त्यांनी नवनवीन गोष्टी शिकून स्वावलंबी व्हावे हाच यामागचा उद्देश्य आहे. यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे म्हणाले,  हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे महिलांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे त्या स्वावलंबी बनतील. या संगणक साक्षरता अभियानात सहभागी झालेल्या सर्व युवती व महिलांना मी शुभेच्छा देतो.

संगणक साक्षरता अभियानाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.मोहनदादा जोशी म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या विचाराने व कार्याने प्रेरित होवून या प्रकल्पाची सुरुवात आज सौ.पूजा आनंद यांनी केलेली आहे. अशा प्रकल्पातून पुणे शहर महिला काँग्रेसला बळकटी मिळेल.’

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, पुणे शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संगणक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Leave a comment