पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

0

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर  आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी तात्काळ निकामी करण्याची कारवाई सुरु केली आहे. या घटनेमुळे पुणे रेल्वे स्थानकावर सध्या भीतीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने  धाव घेऊन पाहणी केली. अद्याप ही स्फोटके कोणी ठेवली याची माहिती मिळू शकलेली नाही. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताबडतोब दोन प्लॅटफॉर्म रिकामे केले आणि पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुद्धा थांबवली आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. जिलेटिनच्या कांड्या पोलिासांनी ताब्यात घेऊन त्या निकामी करण्यासाठी मैदानाच्या ठिकाणी नेण्यात आल्या आहेत. बॉम्ब शोधक पथकाच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरासाची तपासणी केली जात आहे. त्याचसोबत ही वस्तू नेमकी आली कुठून याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Leave a comment