ना. चंद्रकांतदादा पाटील मल्लखांब चषक २०२३ स्पर्धेत ७५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी चित्तथरारक मल्लखांबचे प्रकार सादर

पुणे : ‘शाहू कला क्रीडा अकादमी’च्या माध्यमातून कोथरुड मध्ये ‘नामदार चंद्रकांत पाटील निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शनिवार आणि राविवार असे दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवारी या स्पर्धेला परदेशी पाहुण्यांसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, एशियन मल्लखांब फेडरेशनचे अध्यक्ष राजू जालनापूरकर आणि प्रथम अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन ओव्हाळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होऊन स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ६५ संघांनी सहभाग घेतला असून, ७५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी चित्तथरारक मल्लखांबचे प्रकार सादर करत आहेत.
शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेत मोठ्या गटात रुपाली गंगावणे, निधी राणे, आदित्य पाटील, निरंजन अमृते (मुंबई उपनगर), पद्मनाभ आदमाने, मिथिला उभे, शुभांकर खवले (पुणे), अथर्व कोंडविलकर (मुंबई शहर) तर लहान गटात ओम गाढवे (सातारा) माधवेश लोणकर (मुंबई उपनगर) ओमकार घोरपडे (सातारा) या स्पर्धकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत परिक्षकांसह सर्वांची दाद मिळवली.
या स्पर्धेला नेदरलँड्सचे हर्बर्ट एगबर्ट्स आणि लेस्ली विल्किस, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला ताई खटावकर विजय राजपूत, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री प्रसादजी महानकर, ऑलिम्पिक पटू आणि अर्जुन पुरस्कार विजेते विजयसिंह चौहान यांच्या सह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी स्पर्धेला उपस्थिती लावली.
रविवारी या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह आणि माझ्या हस्ते सायंकाळी ६ वाजता आबासाहेब पटवर्धन क्रीडानगरी येथे संपन्न होणार आहे. हा स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्यामुळे क्रीडारसिकांनी उद्याचा दिवस चुकवू नये, असं चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.