पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

0
पुण्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेली पाहायला मिळत आहे. कोविडचा साप्ताहिक पॉसिटीव्हिटी दर ४९ . ९ टक्के असल्याचे समोर आले आहे. हा दर्जेला आठवड्यात नोंदवलेल्या राज्याच्या सरासरी २४ टक्क्यांच्या दुप्पट आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन कारण्यातयेत आहे. यातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मोहोळ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.

सरकारच्या आकडेवारीनुसार १७ ते २४ जानेवारीदरम्यान आरटीपीसीआर टेस्ट एकूण ८४,९०२ लोकांची पॉसिटीव्ह आली आहे. पुणे शहरातील कोरोनाचे प्रमाण चिंताजनक आहे. हे थांबण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळ्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे सरकारने आवाहन केले आहे. या आकडेवारीवरून पुण्यातील शाळा अद्याप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a comment