दोन दिवसीय इंटरनॅशनल डेंटिस्ट्री ॲन्ड इम्प्लॅन्टॉलॉजी कॉन्क्लेव्ह २०२२ चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन सपंन्न

पुणे : इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटल डेंटिस्ट्रीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय इंटरनॅशनल डेंटिस्ट्री ॲन्ड इम्प्लॅन्टॉलॉजी (implantology) कॉन्क्लेव्ह २०२२ चे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आजच्या आधुनिक काळात सर्व काही डिजिटल होत असताना वैद्यकीय शास्त्रात देखील प्रगती झाली आहे. त्यामुळे डेंटिस्ट्रीचेही डिजीटायझेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी सोसायटीने नवीन विद्यार्थ्यांसाठी यासंदर्भात एखादा अभ्यासक्रम विकसित करावा व आम्ही त्याला सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

चंद्रकांत पाटील यांनी वेळी संबोधित करताना म्हटले कि, पुणे शहर हे सगळ्याच बाजूनी विकसित होत आहे. एज्युकेशनच्या दृष्टीने असो, मेडिकल हब च्या दृष्टीने असो, यासोबतच सांस्कृतिक वारसा देखील या शहराचा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून, महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , लोकमान्य टिळक, असे सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी काम केले, अशा सर्वची हि कर्मभूमी आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले एक आश्चर्य वाटण्यासारखे काम या क्षेत्रात तुम्ही सगळे करत आहात. एक मोठी क्रांती या क्षेत्रात तुम्ही करणार आहात. कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे करत असताना एक मर्यादा असते. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो कि, या क्षेत्रात राज्य सरकार असो वा केंद्र सरकार असो या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी जे काही कायदे बनवावे लागतील. ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला लागणार आहेत, त्यासाठी या राज्याचा मंत्री म्हणून तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
YOU MAY ALSO LIKE
यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक प्रशांत गिरबाने, इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटल डेंटिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे, सचिव डॉ. रत्नदिप जाधव यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.