मोदीजींच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना उभारी मिळते – चंद्रकांत पाटील

0
पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा २०२३ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. भाजपच्या तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने राज्यभरात अनेक शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याची सोय केली होती. पंतप्रधानांच्या देशव्यापी शाळेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून सहभागी झाले. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुसगाव येथील न्यू इंग्लिश स्कुलमधून परीक्षा पे चर्चा मध्ये व्हर्च्युअली सहभाग घेतला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षेच्या तणावाशी करायचा सामना या विषयांवर परीक्षा पे चर्चा मधून मार्गदर्शन केलं. सूसगांव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह चंद्रकांत पाटील कार्यक्रमात सहभागी झाले. मोदीजींच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना उभारी मिळते आणि एक्झाम वॉरियर्स २०२३ च्या अभ्यासासाठी प्रेरित होत आहेत, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

सध्या गॅजेट वापरताना तासन् तास स्क्रीन समोर वेळ दिला जातो. त्यातील कालापव्यय आणि ऊर्जेचा क्षय आपल्या सृजनशीलतेवर दुष्परिणाम करतोय. म्हणून गॅजेटवापर नियंत्रित असावा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा दरम्यान विद्यार्थ्यांना दिला. सर्वात आधी आपल्याला हे ठरवायला लागेल कि सर्वात स्मार्ट आपण आहोत कि गॅजेट. कधी कधी आपणं आपल्यापेक्षा गॅजेट्सना स्मार्ट संजयला लागतो आणि तिथेच चूक व्हायला लागते. गॅजेटचा वापर जितका स्मार्टली कराल तितका चांगला परिणाम तुम्हाला मिळेल, यासारखे महत्वाचे ज्ञान आज मोदींनी विद्यार्थ्यांना दिले.
Leave a comment