मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार … नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

0

मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह, विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक महेंद्र चेंबूरकर, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष मोहन झुंजे पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्षा राघवेंद्र बापू मानकर, आबासाहेब पटवर्धन क्रीडानगरीचे विश्वस्त सोमनाथ तेंडुलकर, शाहू कला क्रीडा अकादमीच्या संचालिका प्राध्यापिका अनुराधा ऐडके, सचिव राज तांबोळी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मल्लखांब हा आपल्या मराठी मातीतील क्रीडा प्रकार आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होणे ही आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे हा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. तसेच पुढील वर्षी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे शाहू कला क्रीडा अकादमीच्या संस्थापिका अध्यक्षा प्राध्यापिका अनुराधा ऐडके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय भव्य दिव्य आणि देखण्या पद्धतीने आयोजन केले. आगामी काळात मल्लखांबसारख्या मातीतील खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शाहू कला क्रीडा अकादमीला लोकसहभागातून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी स्पर्धेतील विजेत्या मल्लखांबपटूंना विशेष पुरस्काराची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली. यात स्परर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला गट आणि पुरुष गटातील मल्लखांब पटूंना एक वर्षासाठीचा सर्व‌ प्रवास खर्च उपलब्ध करून देणार. त्यासोबतच स्पर्धेतील अंतिम १८ स्पर्धकांचे प्रशिक्षकांचे मानधन आणि एक वर्षांचा पाच लाखांचा वैद्यकीय विमा सुरक्षा मिळवून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मल्लखांब हा स्वदेशी खेळ आहे. त्याचा प्रचार प्रसार व्हावा; आणि त्याला राजाश्रय मिळावा हा दादांचा प्रयत्न आहे. आजच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अर्जुन पुरस्कार विजेता देखील हिरीरीने सहभागी होऊन, त्याने चित्तथरारक कसरती सादर केल्या हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मल्लखांबसारख्या स्वदेशी खेळांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे, अशी त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली.

या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम स्पर्धा रुपाली गंगावणे (मुंबई उपनगर) नेहा क्षीरसागर (सातारा), दृती प्रभू (मुंबई उपनगर), खुषी पुजारी (मुंबई), दिलीषा जैन (मुंबई उपनगर), हार्दिका शिंदे (मुंबई उपनगर) यांच्यात रंगली. मुलांमध्ये शुभांकर खवले (पुणे), चेतन मानकर (जळगाव), शार्दुल ऋषिकेश (मुंबई उपनगर), आदित्य पाटील (मुंबई शहर), निशांत लोखंडे (मुंबई उपनगर)
निरंजन अमृते (मुंबई शहर) यांच्यात पाहायला मिळाली.

या स्पर्धेतील‌ १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील पोल मल्लखांबमध्ये‌ हृदया दळवी (प्रथम) प्रपित ढमाल (द्वितीय) आणि शिवानी देसाई (तृतीय) क्रमांक पटकावला. तर रोप मल्लखांब मध्ये सायली गोरे (प्रथम) देवांशी‌ पवार (द्वितीय), सई शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला. १६ वर्षांखालील मुलींच्या पोल आणि रोप मल्लखांब मध्ये दृष्टी प्रभू (प्रथम), वेदिका सावंत (द्वितीय), दिलीषा जैन (तृतीय) क्रमांक पटकावला.

याशिवाय १४ वर्षांखालील मुलांमध्ये पोल आणि रोप मल्लखांबमध्ये‌ विराज अंबरे (प्रथम), समर्थ पांचाळ, (द्वितीय) आणि श्रेयांश शिंदे, (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच १८ वर्षांखालील मुलांच्या पोल गटांत निशांत लोखंडे (प्रथम), निरंजन अमृते (द्वितीय) आणि मंथन मिर्लेकर (तृतीय) क्रमांक पटकावला. रोप मल्लखांब गटात पद्मनाभ आदमाने (प्रथम), शार्दुल ऋषिकेश (द्वितीय) आणि निरंजन अमृते (तृतीय) क्रमांक पटकावला.

१६ वर्षांवरील मुलींच्या गटात पोल आणि रोप मल्लखांबमध्ये रुपाली गंगावणे (प्रथम), नेहा क्षीरसागर (द्वितीय) ,पल्लवी शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच १८ वर्षांच्या पोल आणि रोप मल्लखांबमध्ये‌ शुभांकर‌ खवले (प्रथम), चेतन मानकरे (द्वितीय) आणि आदित्य पाटीलने (तृतीय) क्रमांक पटकावला.

Leave a comment