सोलापुरात एसटीचा भीषण अपघात ; प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस शेतात पलटली

0

सोलापूर :- सोलापुरातील अक्कलकोट- दुधनी रोडवर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस शेतात पलटली आहे. या बसमध्ये एकूण 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. खराब रस्त्यामुळे एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं बोललं जात आहे. ही बस अक्कलकोटहून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्याच दरम्यान एसटीला अपघात झाला. एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात जाऊन पलटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस उलटली आहे. या बसमध्ये एकूण ४५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. रस्ता खराब असल्याने एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.

स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अक्कलकोट येथे हलवण्यात आले असून 2 गंभीर जखमींना सोलापूर सिविल हॉस्पिटल कडे पाठवण्यात आले आहे.

Leave a comment