देशात 31 मार्चपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0

दिल्ली: देशात कोरोनाची लाट ओसरली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्या आणि मृत्यूच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 31 मार्चपासून देशात कोरोनामुळे लागू असलेले सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गृह मंत्रालयाने 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. मात्र मास्कचा नियम आणि सोशल डिस्टंसिंगचे नियमांचे नागरिकांना पालन करावे लागणार आहे.

बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. 24 मार्च 2020 रोजी प्रथमच केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि वेळोवेळी परिस्थितीनुसार त्यात बदलही केला जात होता. मात्र आता कोरोनाची लाट ओसल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधित पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात कोरोनामुळे देशात लाधलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. 31 मार्चपासून हे निर्बंध संपणार आहेत. यानंतर केवळ मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे नियम बंधनकारक असतील.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की “गेल्या 24 महिन्यांत जागतिक महामारीच्या व्यवस्थापनातील विविध पैलू जसे की रोग शोधणे, पाळत ठेवणे, संपर्क शोधणे, उपचार करणे, लसीकरण, रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास इत्यादी संबंधीत अनेक महत्त्वाचे पावले उचलण्यात आली. कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य वर्तनाबद्दल आता सामान्य जनता देखील जागरूक आहे, असे भल्ला पत्रात म्हणाले.

Leave a comment