अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बिग बींनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांना 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी स्वत: रात्री उशिरा ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘मी नुकतीच कोरोना टेस्ट केली असून कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी’. महत्वाचे म्हणजे बिग बींचा प्रसिद्ध शो केबीसीच्या 14 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बिग बींना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता त्यांच्या केबीसीच्या शुटिंगला देखील ब्रेक लागला आहे. अशामध्ये अमिताभ बच्चन यांचे चाहते ते कोरोनातून लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.
https://twitter.com/explore/tabs/covid-19?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1562136557506613249%7Ctwgr%5E808eec36770e6064a19649e6e0c323bedba5925c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fmarathi%2Fentertainment%2Famitabh-bachchan-corona-positive-for-the-second-time-information-given-by-tweeting-5589789%2F
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या घरातील स्टाफची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा कोरोना टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. पण त्यापूर्वी काळजी म्हणून सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे.