देशभरात आजपासून पुढील 75 दिवसांसाठी मोफत ‘बूस्टर डोस’ देण्यात येणार

0

मुंबई :- देशात पुन्हा एकदा कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’ मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशात 75 दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. आजपासून पुढील  75 दिवसांपर्यंत  18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे.

कोरोना संक्रमणामुळे होणारे मृत्यू तसेच गंभीर लक्षणं रोखण्यासाठी कोरोनाविरोधी लसीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. यामुळे आरोग्य मंत्रालयाने लसीच्या दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांवर आणले आहे. यासोबतच केंद्राने प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तक नावाची मोहिम सुरु केली. दरम्यान 18 वर्षावरील व्यक्ती आता कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन घेऊ शकणार आहे.

केंद्र सरकारची मोफक बुस्टर डोस मोहिम केवळ 75 दिवस चालवली जाणार आहे. त्यामुळे बुस्टर डोससाठी नागरिकांना सर्वात आधी कोविड पोर्टलवर बुकिंग करावे लागणार आहे. बुकिंगशिवाय देखील लस मिळेल. लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेता येणार आहे. सरकारी हॉस्पीटलमध्येच फक्त मोफत कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयातून कोणास लस घ्यायची झाल्यास नागरिकांना पैसे मोजावे लागतील, खासगी लसीकरण केंद्रांवर कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

Leave a comment