नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने एका वर्षाच्या कारावासाची सुनावली शिक्षा… काय आहे प्रकरण ?

0

माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँगेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना आज सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावरून सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९८८ साली रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सिद्धू यांच्या शिक्षेत  वाढ करण्याच्या याचिकेवर निर्णय देण्यात आला.

१९८८ साली सिद्धू यांनी पार्किंगच्या वादावरून एका वृद्धाला मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू याना दोषमुक्त केले होते. परंतु पीडित कुटुंबाने पुनर्विचार याचिका दाखल केली. आज या प्रकरणी न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नेमके प्रकरण काय? 
पटियाला येथे १९८८ मध्ये सिद्धू यांनी पॅकिंगवरून भांडण झल्यामुळे ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत वाद झाला आणि सिद्धू यांनी त्यांना  मारहाण केली. गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले.  तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन  फक्त वर्ष झालं होतं. त्यानंतर गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.
Leave a comment