भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

0

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 14 मे 2022 रोजी पदमुक्त होणार आहेत. त्यांच्या जाग्यावर नवे निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे 2022 रोजी आपला कार्यभार सांभाळतील. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुक 2024 ह्या राजीव कुमार यांच्या देखरेखाली होणार आहेत. कारण नियमांनुसार, निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत आहे. कुमार यांचा जन्म फेब्रुवारी 1960 रोजी झाला असल्याने त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत आहे.

राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी,1960 रोजी झाला असून ते भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली. आपल्या कार्यकाळामध्ये राजीव कुमार यांनी केंद्राबरोबरच बिहार, झारखंड या गृहराज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये कार्य केले. राजीव कुमार यांनी बी.एससी, एलएलबी, पीजीडीएम आणि सार्वजनिक नीती याविषयामध्ये एम. ए. केले आहे.

Leave a comment