काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या घरीच क्वॉरंटाईन होणार आहेत. त्यांनी त्यांच्या ट्टिटर अंकाऊटवरुन ही माहिती दिली आहे.
प्रियांका गांधी यांना गेल्या दोन महिन्यांत दोनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी ३ जून रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनादेखील कोरोना झाला होता. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा आजचा राजस्थानमधील अलवर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. तेथे ते पक्षाच्या ‘नेतृत्व संकल्प शिबिर’साठी जाणार होते.
https://twitter.com/priyankagandhi?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1557205603264921600%7Ctwgr%5E900bd3a4d7e18f42f4427278dc5d678bfccbc0e9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F287742%2Fcongress-general-secretary-priyanka-gandhi-vadra-tests-positive-for-covid19%2Far
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,०४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १९,५३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचे १ लाख २८ हजार २६१ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी कोरोनासंसर्गदर ४.९४ टक्के एवढा होता.