अखेर पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू कोर्टासमोर शरण

0

पंजाब :- माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँगेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावरून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणी सिद्धू यांनी आज कोर्टात शरणागती पत्करली. आज सकाळी  नवज्योत सिंह सिद्धू यांनी कोर्टाकडे वेळ मागितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सिद्धू यांना कोर्टापुढे आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ हवा आहे. त्यासाठी ते अर्ज करणार आहेत. आशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सिद्धूंनी आज  दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात शरणागती पत्करली आहे. काही वेळातच  वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी होणार आहे.

काय आहे प्रकरण ?

27 डिसेंबर 1988 पटियाला येथे १९८८ मध्ये सिद्धू यांनी पॅकिंगवरून भांडण झल्यामुळे ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत वाद झाला आणि सिद्धू यांनी त्यांना  मारहाण केली. गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले.  तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन  फक्त वर्ष झालं होतं. त्यानंतर गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने  सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

 

Leave a comment