यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू

0

मुंबई: उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जमखी झाले आहेत. अपघात मध्ये मृत्यू झालेले सर्व प्रवाशी पुण्याचे रहिवाशी आहेत.

यमुना एक्स्प्रेस वेवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामध्ये चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झला आहे. मृत व्यक्तीचे नावे चंद्रकांत नारायण बुराडे (६८), स्वर्णा चंद्रकांत बुराडे (५९), मालन विश्वनाथ कुंभार (६८), रंजना भरत पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३, कर्नाटक) अशी आहेत.

Leave a comment