पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण… हि बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जातील

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आज अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण केले. हि बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावांने ओळखली जातील.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग द्वारे कार्यक्रमात सहभाग घेत नामकरण केले. गृहमंत्री अमित शाह नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोर्ट ब्लेअरला पोहोचले असून मोदींनी देशाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदींनीं  देशाला संबोधित करताना म्हटले कि, २१ बेटं आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावांने ओळखली जाणार आहेत. येणाऱ्या पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. हि बेटं  पुढच्या पिढ्यांसाठी चिरंतन प्रेरणास्थान असतील, असे मोदी यांनी म्हटले.

अंदमानची हि भूमीत पहिल्यांदाच आकाशात मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीतून अपार वेदनासोबत ऐकू येतात. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. नेताजींच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणू संजर केला जातो, असे मोदी यांनी म्हटले.
Leave a comment