मध्यप्रदेशमध्ये सुखोई-३० आणि मिराज २००० विमान कोसळलं

0

आज सकाळी मध्यप्रदेशात एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त समर आले आहे. भारतीय हवाई दलाची दोन विमानं कोसळली. सुखोई-३० आणि मिरज २००० हि विमानं कोसळल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या अपघतानंतर बचावकार्य सुरु आहे. दोन्ही विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगण्यात येत आहे. हवाई दलाकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

शनिवारी सकाळी मध्यप्रदेशातील मोरेना येथे सुखोई – ३० आणि मिराज २००० हि हवाई दलाची विमान कोसळली. ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होत. सुखोई -३० मध्ये २ वैमानिक आणि मिराज २००० मध्ये एक वैमानिक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
दोन्ही विमानांची हवेत धडक झाली कि नाही, याची हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस निल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्याकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेत आहेत.
यासोबतच राजस्थानमधील भारतपूरमध्ये भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं असल्याची माहिती मिळाली आहे. पिंगोरी रेल्वे स्टेशनजवळ हे विमान कोसळला आहे. या विमानाने पेट घेतला.

Leave a comment