अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर अडकले विवाहबंधनात

0

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. हे लग्न अखेर पार पडलं आहे. हार्दिक आणि अक्षया अखेर लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुण्यामध्ये हार्दिक आणि अक्षयाचा खास विवाह सोहळा आज पार पडला.

हार्दिक आणि अक्षयानवे लग्नाच्या विधींसाठी खास पारंपरिक लूक केला होता. हादिक चक्क घोड्यावर बसून मंडपात आला. राणादा आणि पाठकबाई यांची रीळ जोडी खऱ्या आयुष्यात जोडीदार झाले आहेत.  नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजशृंगार असा पाठक बाईंचा नववधू साज आहे. हादिक ने कोल्हापुरी पेहराव केला आहे. दोघांनी पारंपरिक पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. दोघांचा शाही अंदाज पाहायला मिळाला.

 

हार्दिक जोशी आणि अक्षया सातत्याने चर्चेत आहेत. या लोकप्रिय जोडीवर सध्या खूप परम, आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांनीही अगदी थाटा – मटात लग्नसोहळा केला आहे. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील हि लोकप्रिय जोडी. या दोघांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. आता हि जोडी खर्या आयुष्याचे जोडीदार बनले आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a comment