फुलपाखरू फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत अडकली लग्नबंधनात

0

मुंबई :- ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे घराघरात पोहचली आहे . हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर ही अभिनेत्री तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. चाहते अभिनेत्रीबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे.  हृताने  18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत  लग्नबंधनात अडकली आहे. सध्या सोशल मीडियावर हृताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री भावुक झालेली पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने  चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. हृताने साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. हृताची ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर ‘तेरी मेरी इक जिंदडी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीक शाहने केलं आहे.

हृता दुर्गुळेचा सध्या एक व्हिडीओ फारच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वेडिंग हॉलमध्ये एन्ट्री करतांना दिसून येत आहे. मात्र लग्नाच्या मंडपात पोहोचताच हृता अत्यंत भावुक होते. त्यांनतर तिला अश्रू आवरणं कठीण होतं. आणि ती रडू लागते.अभिनेत्रीला पाहून आईच्या डोळ्यातसुद्धा अश्रू तरळतात. सर्वसामान्य मुलगी असो किंवा अभिनेत्री लग्न हा त्यांच्या आयुष्यातील फार भावुक क्षण असतो. आणि या खास क्षणाला असे आनंदाश्रू येणं फारच साहजिक आहे. सध्या हृताचा हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा भावुक होत आहेत. तसेच अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Leave a comment