Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले घेणार ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री

मुंबई : हिंदी ‘बिग बॉस’च्या 15 व्या सीझनने अर्धा प्रवास पूर्ण केला असला तरी या सीझनने चाहत्यांची निराशा केली हेही तितकंच सत्य आहे. स्पर्धक घरात विशेष काही करताना दिसत नाहीत. काही वेळा त्यांच्या मुद्द्यांवरच्या भूमिकेबद्दलही संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी शोमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी एकामागून एक वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री केली आहे. देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई, राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांनी देखील अलीकडेच शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. तर आता ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि राजकारणी अभिजीत बिचुकले यांनीही घरात एंट्री घेतली आहे.
‘बिग बॉस 15’च्या घरात राखी सावंतने प्रवेश करण्यापूर्वी अभिजित बिचुकलेंना वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश देण्यात आला हाेता. परंतु बिचुकलेंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची एंट्री थांबवण्यात आली हाेती. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून अभिजित बिचुकलेंची एंट्री दाखवण्यात आली आहे. आता बिचुकले घराघरात कोणती समीकरणं तयार करणार आहे हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. विशेष म्हणजे घरात प्रवेश करताच बिचुकले आणि रियाझ यांच्यात तू-तू-मैं-मैं झाली आहे.
अभिजित बिचुकले शेवटच्या चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांसह ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार होते. मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते क्वारंटाईन होते. पण आता अभिजीत बिचुकले कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी पुन्हा जोशात बिग बाॅगसच्या घरात प्रवेश केला आहे. अभिजीत बिचुकले यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वीच सांगितलं आहे की, ते हा शो अधिक मनोरंजक बनवतील आणि त्यांना जर पाठिंबा मिळाला तर ते या सीझनचा विजेता होतील.