बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ दिसणार नव्या भूमिकेत… या नव्या मालिकेतून येणार आपल्या भेटीला

0

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन अतिशय गाजला. या सीझनमध्ये वाद- भांडण यासोबतच स्पर्धकांची धमाल मस्ती यामुळे स्पर्धकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. या सीझनमधील एक स्पर्धक म्हणजे मीरा जगन्नाथ. मीराने प्रेक्षकांची मने जिंकली.  त्यामुळे बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यावरही मीराने प्रेक्षकांची मने जिंकली. मीरा आता आपल्या भेटीला पुन्हा येणार आहे. एका नव्या मालिकेतून मीरा आपल्या भेटीला येणार आहे.

मीरा जगन्नाथ एका नव्या मालिकेत एंट्री घेणार आहे. स्टार प्रवाह वर नुकत्याच एका नव्या  मालिकेचा प्रोमो येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘ठरलं तर मग’ . मीरा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. या नव्या मालिकेत मीरा नाक्की कोणती भूमिका निभावणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
मीराला नव्या  भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका घेऊन येत आहे. ठरलं तर मग या मालिकेचं नाव आहे. जुई गडकरी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. येत्या ५ डिसेंबर पासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतूनचं मीरा देखील आपल्या भेटीला येणार आहे.

 

Leave a comment