बिग बॉस मराठी 3 ; सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई बिग बॉसमधून बाहेर

0

मुंबई :- बिग बॉस मराठी सिझन ३ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या सीझनमधील टास्क आणि स्पर्धकांची भांडणे हे दोन्ही मनोरंजक असतात. दरम्यान, या स्पर्धेतून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई बिग बॉसमधून बाहेर पडल्या आहेत.  यावेळी तृप्ती देसाई  भावूक झालेल्या दिसल्या. घरातील सदस्य देखील तृप्ती ताईंना निरोप देताना भावूक झाले. यावेळी तृप्ती देसाई यांनी सर्वांना चांगलं खेळण्याचा सल्ला दिला. तृप्ती देसाईंना निरोप देताना इतर स्पर्धकांना अश्रू अनावर झाले तसेच  बिग बॉस मराठी सिझन ३ सूत्रसंचालक महेश मांजरेकरही देखील हळहळ व्यक्त केली.

बिग बॉस स्पर्धक विकास, जय आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये वूट द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. आता जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. मागच्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल निकम, तृप्ती देसाई, जय दुधाणे, सोनाली पाटील आणि मीनल शाह हे पाच स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले महेश मांजरेकरांनी सांगितले. या दरम्यान तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील यांच्यात किचनमध्ये भांड्याला भांडं लागलं होतं. ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, असं चढ्या आवाजात तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या. यावेळी सोनालीने ‘महिला’ हा मुद्दा उचलून धरत, या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात, महिला, महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला…’ असा खोचक टोला तृप्ती देसाई यांना लगावला होता.

Leave a comment