बिपाशा बासू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

0

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने आज गुड न्यूज दिली आहे. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशाने हि आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नंतर ता बिपाशाने देखील मुलगी झाल्याची आनंदाची दिली आहे.

बिपाशा बासूच्या गरोदरपणीच्या फोटोशूट बद्दल खूपच चर्चा रंगली होती.  त्यानंतर तिच्या डोहाळे जेवणाची चर्चा देखील रंगली होती. आज अखेर बिपाशा आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. आज सकाळी तिने बाळाला जन्म दिला. त्यांच्या  चाहत्यांनी त्यांना यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
बिपाशा आणि करणची ओळख अलोन चित्रपटाच्या वेळी झाली. ते दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. २०१६ मध्ये त्यांनीं लग्न केले. दोघांच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली. गेल्या महिन्यात बिपाशाने एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, तिला आणि करणला मुलगी हवी होती. त्यांच्या घरी मुलगी जन्माला यावी अशी त्यांची इच्छा होती आणीन हि इच्छा आज पूर्ण झाली.

 

Leave a comment