बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती

0

मुंबई :- बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने त्याच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. . कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी भारताला सन्माननीय देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे, त्यामुळे अभिनेता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारतीय प्रतिनिधी मंडळ म्हणून कान्स महोत्सवात सहभागी होणार होते. आत्तापर्यंत, कोरोनाची लागण झाल्यामुळे, अभिनेता 17 मे पासून सुरू होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नाही.

अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अक्षय पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत.” ही पोस्ट अक्षयने अनुराग ठाकूरला टॅग केली आहे. अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अक्षय ‘राम सेतु’ सिनेमाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवले होते.

अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता, देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं”. पृथ्वीराज सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे.

Leave a comment