बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 नव्हे 2 नव्हे तर चक्क 4 वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार

0

बिग बॉस मराठीच्या चौथे पर्व रंजक दिवसेंदिवस होत चालले आहे.  स्पर्धकांमध्ये वाद विवाद, टास्क  आणि भांडणामुळे हा सीझन चांगलाच चर्चेत आहे. आता काहीच आठवडे राहिले असल्यामुळे नवे नवे ट्विस्ट खेळात आणले जात आहेत. या वीकेंडला बिग बॉसच्या घरात एक नवा ट्विस्ट येणार आहे. नवीन चार सदस्यांची बिग बॉसच्या घरात एंट्री होणार आहे. त्यामुळे  आता प्रेक्षकांना याची उत्सुकता लागली आहे.

नुकताच कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये घरात चार वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या घरात सदस्यांचे चांगलेच वाद रंगत आहेत आणि यातच आता नवे चार चेहरे येणार म्हटल्यावर नेमकं घरात काय होणार याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.
बिग बॉसच्या या चौथ्या पर्वत शनिवारी आणीन रविवारी चावडीवर या चार सदस्यांची एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात प्रथमच चार सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण हे चर सदस्य नेमके कोण आहेत याबाबत मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे. आतार्यंत स्नेहलता वसईकर हिने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. आता ५० दिवस झाल्यावर हे चार सदस्य घरात प्रवेश करणार आहेत. यामुळे आता पुढील भागात काय ट्विस्ट पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना  उत्सुकता लागली आहे.

 

Leave a comment