बॉक्स ऑफिसवर झाली ‘तिरसाट’ची हाऊसफुल सुरवात… पहिल्याच दिवशी ५ सिनेमागृहांत हाऊसफुल

0

राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के यांची फ्रेश  जोडी असलेला  ‘तिरसाट’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ‘तिरसाट’ची हाऊसफुल सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी प्री बुकिंगच्या माध्यमातून ५ सिनेमागृहांत हाऊसफुल झाला आहे.

सिटी प्राईड – कोथरूड, बॉलिवूड मल्टिप्लेक्स- खराडी , वैभव चित्रमंदिर – हडपसर , ममता – मोहोळ , आशा – बार्शी या पाच चित्रपट गृहांमध्ये तिरसाट या चित्रपटाचा हाऊसफुल बोर्ड पाहायला मिळाला. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगलीच बाजी मारल्याचे दिसत आहे.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सने ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उमेश शेडगे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. निर्माते दिनेश किरवे यांनीच या चित्रपटाचे लेखन केले आहे. प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिगदर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. पी शंकराने यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के हि जोडी नव्यानेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
प्रेम मिळविण्यासाठी सहन करावा लागणार विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. उधाण आलंया, फर्मान आलया अशा शब्दात संगीतबद्ध केलेली गाणी देखील या चित्रपटात आपल्याला आनंद देणारी आहेत .ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजित चौरे, विवेक यादव, श्रुती उबाळे, यतीन कार्यकार या कलाकारांच्या देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Leave a comment