महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनीं अखेरचा श्वास घेतला. सुलोचना यांनी साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्याचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली.

सुलोचना यांचे आज दुपारी १२ च्या सुमारास मुबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. लावणीने आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपट सृष्टीतील ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भुरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली  जात आहे.
आज दुपारी मारिन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून  अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवलं. सुलोचना चव्हाण यांचा भारत सरकारने पदमश्री देऊन सन्मान केला होता. सोळावं वारीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, यासारख्या लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत.
Leave a comment