‘धर्मवीर’ चित्रपटाविषयी निर्माता मंगेश देसाईने सांगितला किस्सा, कि नेमका ‘धर्मवीर’ कसा सुचला…

0

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट उद्या १३ मे रोजी आपल्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलरच पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून घेतले आहे. हा चित्रपट कधी प्रदरहित होणार याची उत्सुकता आहेच. अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक अगदी आनंद दिघे यांच्यासारखे दिसत आहते. त्यांची देहबोली आणि संवाद साधण्याची पद्धत अगदी तशीच वाटावी अशी साकारण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते हे अभिनेते मंगेश देसाई आहे. त्यांनी या चित्रपटाविषयी आणि आनंद दिघे यांच्यावर चित्रपट काढण्याची नेमकी कल्पना कशी सुचली याबाबत माहिती दिली.

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सध्या अतिशय चर्चेत आहेत. निर्माते मंगेश देसाई यांना या चित्रपटासाठी आपले एक घर देखील विकावे लागले. या चित्रपटाची सुरुवात कशी झाली याबद्दल मंगेश देसाई यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली.  मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांनी मला एकदा ऑफिसला भेटायला बोलावले. त्यांनी मला सांगितले माझं एक ड्रीम  प्रोजेक्ट आहे. दिघे साहेबांवर त्यांनी एक डॉक्युमेंट्री केली होती. आणि यावर एक फिल्म बनवायची आहे असे सतीश मोतलिंग  यांनी म्हटले. मी त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना सांगितलं कि याना आनंद दिघे यांच्यावर चित्रपट काढायचा. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावर काम करण्यासाठी सुरुवात झाली , पण ती पुढे जाऊन कुठेतरी थांबली. पण माझ्या डोक्यात सतत त्याबाबत विचार सुरु झाला. मग दिघे साहेबनविषयी मी जास्त जाणून घ्यायला सुरुवात केली. दिघे साहेब हे खूप मोठे आहेत. माणूस म्हणून त्यांनी जे काही केलय हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे तिथूनच या सगळ्याची सुरुवात झाली, आणि उद्या हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

सर्वसामान्य लोकांच्या भावना मांडणारा, राजकीय नेत्यांची वेगळी व्याख्या मांडणारा हा चित्रपट असून प्रेक्षकांना याची अतिशय उत्सुकता आहे. या चित्रपटाचे निर्माते -अभिनेते मंगेश देसाई, लेखक -दिगदर्शक प्रवीण तरडे , अभिनेता प्रसाद ओक आणि क्षितीश दाते अशा सगळ्या मान्यवरांचे योगदान या चित्रपटाला लागले आहे.

झी स्टुडिओज , मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् निर्मित असलेला आणि प्रवीण तरडे यांच्या लेखन , दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment