ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन … वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
मराठी चित्रपटसृष्टी तसेच मराठी रंगभूमीवर मागील पाच दशकांपासून अधिक काळ आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील १२ दिवसांपासुन उपचार सुरु होते.  दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, परंतु काल पुन्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले होत. पणन आज अखेर वयाच्या ७७ व्या वर्षी त्याचे निधन झाले आहे.  त्यांच्या या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे  पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. आज संध्याकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका, मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी देखील सांभाळली. रंगभूमीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांचा विशेष असा दबदबा होता. तयावीण साकारलेल्या अशा अनेक भूमिका आहेत ज्या अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अग्ननिहोत्र मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री हि भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.
नटसम्राट, काळात नकळत , दुसरी गोष्ट, अनुमती, मी शिवाजी पार्क, आघात, या मराठी सिनेमांमध्ये त्यांचा अभिनय अविस्मरणीय होता. स्वर्ग नरक, इंसाफ , अग्निपथ, खुदा गावः, अधर्म या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी सध्याचं वेबसिरिजमध्ये काम केले. उडाण, सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन, जीवन साथी या वेब सीरिजमध्ये त्यांनी काम केले.
Leave a comment