जगद्विख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

0

ज्येष्ठ , प्रख्यात ,जगद्विख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले. संतूर वादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी अशी प्रतिष्ठा निळवून देणारे असे हे शिवकुमार शर्मा. आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
शिवकुमार शर्मा यांच्या मागे यांच्या पत्नी आणि पुत्र आहे.

शर्मा यांनी संगीत विश्वात अतुलनीय असे योगदान दिले आहे. संतूर हे काश्मीर मधील लोकवाद्य आहे त्याला संगीत दरबारात त्यांनी मानाचे  स्थान निर्माण करून दिले. चित्रपट सृष्टीतही त्यांचं संतूर वादनाच्या आठवणी अनेक आहेत. खासकरून सिलसिला या चित्रपटासाठी त्यांनी दिलेली साथ.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत त्यांची जोडी अनेकदा असायची. शिव हरी या नावाने ते ओळखले जायचे. त्यांनी मिळून अनेक चित्रपटात संगीत दिले. कॉल ऑफ द व्हॅली हि ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय ठरली. सिलसिला सोबतच चांदणी, लम्हे, फासले डर या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

संतूर या वाद्याला त्यांनी आपल्या अद्भुत कलेने अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले.भारतीय संगीतविश्व कधीच विसरू शकणार नाही.पद्मश्री पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने ते सन्मानित होते.झनक झनक पायल बाजे आणि सिलसिला या सिनेमात त्यांचे संगीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसोबत राजकीय वर्तुळात अनेक मान्यवरांनी पंडित शिवकुमार शर्मा यां श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Leave a comment