चीन आणि जपान सह काही महत्वाच्या देशांमधून येणाऱ्या प्रावाशांची RTPCR चाचणी बंधनकारक असणार, मोदी सरकारचा निर्णय

0
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये कहर माजवला आहे. ची आणि जपान या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारताने देखील या व्हेरिएंन्टचा सामना करण्यासाठी तयारी  सुरु केली आहे.  मोदी सरकारने याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चीन आणि जपान सह काही महत्वाच्या देशांमधून येणाऱ्या प्रावाशांची RTPCR चाचणी बंधनकारक असणार आहे. भारताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबातची माहिती दिली आहे.
मनसुख मांडवीय यांनी म्हटले कि, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग आणि थायलंड या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR  चाचणी सक्तीची असणार आहे. ज्या प्रवाशाला लक्षण आढळतील किंवा ज्या प्रवाशाची चाचणी पॉसिटीव्ह येईल त्या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येईल. प्रवाशांना एक फॉर्म भरणे देखील सक्तीचे आहे. या फॉर्म मधून आपल्या प्रकृतीची सद्यस्थिती नमूद करावी लागणार आहे.

चीन आणि जपान या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या मुळे सरकार आता अलर्ट मोडवर आहे. मनसुख मांडवीय यांनी सलग तीन दिवस बैठक घेऊन राज्यांमधल्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली.
मनसुख मांडवीय यांनीं काही सूचना देखील दिल्या आहेत. 
नव्या वर्षाच्या  स्वागताचा उत्साह लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तो लक्षात घेऊन व्हॅक्सिनेशनवर भर द्या. महत्वाची बाब म्हणजे मास्क लावणं, हात स्वच्छ ठेवणं आणि सोशल डिस्टन्सिंग कस राहील हे पाहणं म्हणजेच कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याच नागरिकांना आवाहन करावं अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यांनी कोव्हिड १९ संदर्भातील तयारी करून ठेवा आणि आरोग्य विषयक तयारी सुसज्ज ठेवा अशाही सूचना दिल्या आहेत.
Leave a comment