कोरोनाचा धोका वाढत आहे… कर्नाटकात मास्क अनिवार्य

0

पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना वेगाने पसरत असताना भारतात कोरोनाला रोखण्यासाठी तयारी सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्य सरकार आता सतर्क झाली आहेत. अनेक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकात मास्क सक्ती करण्यात आली आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व बंद इमारतींमध्ये मास्क सक्ती केली गेली आहे. आरोग्य विभागाने कोविड सुरक्षा प्रोटोकॉल जारी केला आहे. यासोबतच लोकांना मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
कर्नाटक राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी याबाबत माहिती दिली कि, चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या जरी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सर्व बंद इमारतींमध्ये मास्क बंधंनकारक करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम कोविड चाचणी करण्यात येणार आहे. सरकार दररोज २००० ते ४००० रुग्णांची चचन्नी करणार आहे. जिल्हा रुग्णालयांना  कोविड  रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बूस्टर डोस देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
Leave a comment