मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वांद्रे-कुर्ला संकुलात आज जाहीर सभा ; वाहतूक सेवेत बदल

0

मुंबई :- शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वांद्रे-कुर्ला संकुलात जाहीर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. भोंगा. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.

आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. या सभेसाठी एमएमआरडीए मैदानावर मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

वाहतूक सेवेत बदल 

  • वरळी सी लिंकवरून कुर्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस भारत नगर जंक्शनवरून कुर्ल्याकडे जाण्यास प्रतिबंध असेल.
  • संत ज्ञानेश्वर नगरकडून येणारी आणि कुर्ल्याकडून भारत नगर जंक्शनने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असेल.
  • खेरवाडी शासकीय वसाहत, कनकिया पॅलेस, यूटीआय टॉवर आणि चुनाभट्टी येथून कुर्ल्याच्या दिशेने येणारी वाहने प्रतिबंधित असतील.
  • कुर्ला आणि रज्जाक जंक्शनवरून पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वरळी सी लिंककडे जाणारी वाहनांची वाहतूक एमटीएनएल जंक्शनपासून भारत नगर जंक्शनकडे जाण्यासाठी प्रतिबंधित असेल.
Leave a comment