डॉ. होमी भाभा राज्य समूह या विद्यपीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – चंद्रकांत पाटील

0
मुंबई  : डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. होमी भाभा यांचा अर्धाकृती पुतळा आणि ई-लर्निंग स्टुडिओचंही ऑनलाइन उद्घाटन झालं.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यपीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले कि, डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.  या विद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात असे कोश्यारी यांनी म्हटले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षणचे विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ कुलगुरू प्रा. रजनीश कामत  हे देखील उपस्थित होते.
Leave a comment