वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात डॉक्टर आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस

0

मुंबई : आजपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविड काळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना बूस्टर डोस  देण्यात येणार आहे. आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात या बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, लसीकरण प्रमुख डॉ.ललित संखे यांच्यासह डॉक्टर आणि जे.जे. रुग्‍णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिबंधात्मक मात्रा दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कर्मचारी याबरोबरच 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यावर हा बूस्टर डोस अतिशय उपयुक्त ठरणार असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बूस्टर डोससाठी नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. खासगी केंद्रात लास घ्यावयाची असली तरीही सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतरच खासगी केंद्रावर लास घेण्यास परवानगी असेल. सहव्याधी असलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

Leave a comment