लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण… ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

0

कोरोनाची रुग्णसंख्या आता पुन्हा वाढत आहे. शासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून काही निर्बंध लावले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. राजकीय वर्तुळात, सामाजिक क्षेत्रात तसेच मनोरंजन क्षेत्रात  देखील कोरोनाच शिरकाव झालेला पाहायला मिळत आहे. आज भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लता मंगशकर यांचे वय सध्या ९२ वर्ष आहे. त्यांना कोरोनाची लगण झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या अति दक्षता विभाग म्हणजे आयसीयू मध्ये आहेत. त्यांच्या वयामुळे त्यांना घरी काळजी घेण्याचा सल्ला ना देता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांच्यावर  सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना अगदी सौम्य लक्षणं आहेत, अशी माहिती त्यांची भाची रचना यांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिली आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील कोरोना चाचणी करणार असल्याचे समोर आले आहे.

Leave a comment