चंद्रपूर- मूल महामार्गावर पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात ; अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू

0

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये धडक झाल्यानं अपघात झाला. अपघात झाल्यानंतर आग लागली आणि त्यानंतर ट्रकचे टायर फुटल्यानं आग आणखी भडकली. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, आगीमुळे ९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अजयपूर गावाजवळ काल रात्री (गुरुवारी रात्री) हा अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे अपघात झाला. अपघातानंतर त्याठिकाणी मोठी आग लागली. एवढंच नव्हे तर त्यादरम्यान टायर फुटल्यानं आग आणखी भडकली. बघता बघता आगीनं रौद्र रुप धारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे मृतदेहाची राख झाल्याची विदारक दृश्यं नजरेस पडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये टँकरमधील चालक-वाहकांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा या घटनेत मृत्यू धाला. ट्रकमधील ७ जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. चालक अक्षय सुधाकर डोंगरे (30) बीटीएस प्लॉट बल्लारशा, मजूर प्रशांत मनोहर नगराळे (28), कालू प्रल्हाद टिपले (35), मैपाल आनंदराव मडचापे (24),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (40),साईनाथ बापूजी कोडापे (35), संदीप रवींद्र आत्राम (22) सर्व राहणार दहेली व टँकरचालक हाफिज खान (38) अमरावती, मजूर संजय पाटील (35) वर्धा अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

Leave a comment