ठाकरे सरकारकडून गुढीपाडव्याचे जनतेला मोठे गिफ्ट, कोरोना निर्बंध एकमताने हटवले

0

मुंबई: देशात मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले होते. यामध्ये धार्मिक कार्यक्रम लग्न संमारभ जयंती अशा विविध कार्यक्रमाला निर्बंध घाणून देण्यात आले होते. मात्र आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. अशी माहीती जितेद्र आव्हाड यांनी ट्टिट करत दिली आहे.

राज्यात निर्णयामुळे राज्यातील जनेतेच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपलेला गुडीपाडवा सण आता महाराष्ट्रातील जनेतेला मोठ्या उत्साहात साजरा करता येणार आहे. तसेच रमजान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा थाटात साजरी होणार आहे. राज्यातील निर्बंध हटवल्याने सर्व सण आता उत्साहात साजरे करता येणार आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्टिट मध्ये म्हटले आहे की, राज्यात कोरोना निर्बंध पूर्णपणे शिधील करण्यात आले आहेत. त्यांमुळे येणारा गुडीपाडवा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आव्हान केले आहे. तसेच रमजान सुद्धा आता धुमधडाक्यात साजरी करा. या निर्णया बाबात मंत्री मंडळात चर्चा करण्यात आली होती, यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a comment