दापोली पोलीस स्टेशनला भीषण आग ; अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

0

दापोली :- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील पोलीस स्टेशनला भीषण आग लागली आहे. दापोली पोलीस स्टेशनच्या मुख्य इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण सध्या कळू शकलेले नाही.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत पोलीस ठाण्यात असलेले महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या बंदुका आणि काही दस्ताऐवज बाहेर काढण्यात दापोली पोलीसांना यश आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तत्काळ पोहोचले घटनास्थळी आहेत.

आग लागण्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी तात्काळ भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला, तर आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच आगीची माहिती मिळताच दापोली नगर पंचायत नगराध्यक्ष ममता मोरे, भाजपचे केदार साठे यांनी या ठिकाणी भेट दिली.

Leave a comment