नांदेड : त्रिकुट येथील मॅरेथॉन स्पर्धेत तिनशे युवा-युवतींनी घेतला सहभाग

0

नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षे व रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने त्रिकुट येथील संगमावर घेतलेल्या मॅरेथॉन स्पर्धेने आज रविवारी नवी ऊर्जा दिली. पंचक्रोशीतील गावांसह इतर तालुक्यातून सुमारे 300 व्यक्तींनी यात सहभाग घेतला. याचबरोबर येथील संगमवार असलेल्या गणपती मंदिर परिसर व गोदावरीचे पूजन करून महिला बचत गटातील सदस्यांसह सर्वांनी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आपण प्रदुषणाचा भाग ठरणार नाही याबद्दल कटिबद्धता व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, उप जिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, माता साहिब गुरुद्वारा बोर्डचे मुख्य जेथेकार बाबा तेजासिंग महाराज, बाबा गुलाबसिंग खालसा, उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसिलदार मुंजाजी काकडे, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे, क्रीडा शिक्षक कुलकर्णी, त्रिकुट गावातील जेष्ठ नागरिक व प्रतिनिधी, विस्तार अधिकारी गोविंद मांजरमकर, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक इरवंत सुर्यकार, ग्रामसेवक आय. एन. गुरमे, सरपंच नागोराव वडजे, ब्राह्मण वाडा येथील उपसरपंच प्रतिनिधी एकनाथ बत्तलवाड, नांदेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी /ग्रामसेवक आदींची लक्षणीय उपस्थित होती.

यावेळी विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. दरम्यान या कार्यक्रमात महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या सदस्या, समूह संसाधन व्यक्ती सुजाता बुक्तरे, सारिका तिडके, मिनाक्षी वाघमारे, रयत सेवाभावी संस्थेचे प्राध्यापक संतोष शिंदे, नितिन गादेकर,मानसिंग टोमके, चंद्रकांत मेटकर, संतोष खोसडे, स्वछ भारत अभियानाचे चंद्रमुनी कांबळे आदींनी यात योगदान दिले.

Leave a comment