दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर

आज भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाने सगळ्यांचे लक्ष वेधले. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राने प्रसिद्ध अशा साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. आज दिल्ली येथे पथसंचालनात १७ राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सादर करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा साडेतीन शक्तिपीठं आणि नारीशक्ती हि संकल्पना सादर केली. या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तृत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर यावे यासाठी हि संकल्पना आखली गेली.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवीत असल्याची मोठी प्रतिकृती आहे. समोरच्या डाव्या आणि उजव्या भागात पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यासिनच्या प्रतिमा आहेत. शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा आहेत. मागच्या बाजूस पोतराज आणीन हलगी वाजविणाऱ्या भक्तांची मोठी प्रतिकृती आहे. मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करणार आहेत. यासोबतच शेवटी मागच्या बाजूस नरी शक्तीचे प्रतिनिधित्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा दिसत आहे, असे एकूणच आपल्या चित्ररथाची मांडणी आहे.
शुभ ऍड या संन्स्थेने चित्ररथाला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनीं चित्ररथात साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले आहे. प्राची गडकरी यांनीं हे गीत लिहिले आहे. व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली आहे.