याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड ; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट

0

मुंबई :- अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.

केतकी चितळेने तिच्या फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट वकील नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. केतकी चितळे हिने पोस्ट मध्ये म्हंटलं आहे कि,

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त 

केतकी चितळेने केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडिया युजर्सने केतकीला सुनावलं आहे. तसेच या पोस्टमुळे अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. तसेच  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील संताप व्यक्त केलाय. चि चि चवताळीस बाई तू, महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती,मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात , लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप
#सडकी #केतकी #चितळे अशा संतप्त शब्दात टीका केली आहे.

Leave a comment