मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवा ; नवनीत राणांचे आव्हान

0

दिल्ली :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली आहे.  नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पोहचले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांनी नंतर माघार घेतली आहे. तर आता महाराष्ट्रातील संकट मुक्तीसाठी दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे दात तोडण्याची एवढी ताकद असेल तर औरंगजेबच्या कबरीवर ज्यांनी फूल अर्पण केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडलं आहे. हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा. महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांना आणि शिवरायांना मानणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवर हार अर्पण करतात. सगळ्यात मोठा गुन्हा या लोकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या टीझरमध्ये ज्या प्रमाणे दात तोडण्याचे दाखवण्यात येत आहे. जर एवडी ताकद ताकद आहे तर त्यांची दात तोडून दाखवा तर आम्ही मानतो असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करावी असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे.

तसेच पुढे म्हणाल्या कि,उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालीसा मला बोलता येईल त्या ठिकाणी मी बोलणार. मला बंद करण्यासाठी 14 दिवस कमी पडतील. दिल्लीतील हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे आम्ही येथे महाआरती करत आहोत.

Leave a comment