२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, तसंच महाराष्ट्रात युतीचं सरकार यावं  यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावं – चंद्रकांत पाटील

0

पुणे :   भाजपा पुणे शहरच्या वतीने सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सेवा, संघर्ष, संघटनवर कार्यकर्त्यांनी भर देऊन, समाजातील वंचित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी, असे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीची त्रिसूत्री सांगितली, तसेच २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, तसंच महाराष्ट्रात युतीचं सरकार यावं  यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावं असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटले कि, चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष झाल्यावर त्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे, परंतु बावनकुळे यांनी मला असे सांगितले कि, हे सत्कार वगैरे  होतील.  आता  २०२४ च्या लोकसभांना १६ च महिने राहिलेत आणि विधानसभांना  फक्त २४ महिने राहिलेत. या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्यावेळेला  ४८ पैकी भाजप – शिवसेना मिळून  ४१ जागा आपण विजयी झालो होतो. सहयोगी पक्ष बदलला परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप मिळून  ४१ च्या ४५ जागा करण्याचा बावनकुळे यांचा संकल्प असल्याचे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि,  तीन  सूत्रींवर  हा पक्ष वाढला. पहिला आहे सेवा.जर  सेवेमध्ये निरपेक्ष भाव, मत मिळणार कि नाही, याचा विचार नसावा. आम्हाला मोबदला मिळणार कि नाही याचा विचार नाही.दुसरा म्हणजे संघर्ष , सरकार नसताना विरोधी पक्ष म्हणून संघर्ष. सरकार असताना सगळे ठिकाणावर राहावे यासाठी संघर्ष. तिसरं म्हणजे निवडणूका. राजकीय पक्ष आपणं आहोत, आपण निवडणूक जिंकणार. सेवा, संघर्ष, संघटन उभं केलं कि निवडणूक जिंकणं काही अवघड नसतं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

निवडणुका  जिंकून हा आपल्या कामातील एक भाग आहे पण नेहमी सतर्क राहणं. आपले सरकार आल्यानंतर सुद्धा सतर्क राहणं. एखाद्या पोलीस स्टेशनच्या  हद्दीत एखादा अन्याय झाला तर सरकार असून देखील त्या पोलीस स्टेशनच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल. मोदीजींच्या योजना, देवेंद्रजींच्या योजना या राबविल्या पाहिजेत आणि वेळ पडली तर स्वतःच्या खिशातही हात घालण्याची पुण्यातील कार्यकर्त्यांची तयारी असली पाहिजे असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना सेवाही करायची आहे, संघर्ष करायचा आहे .   जिल्हापरिषद , नगरपालिका यासारख्या निवडणूक आहेतच  आणि त्या जिंकायच्याच आहेत. गेल्या  चार वर्षांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी आपण क्रमांक एक वर गेलेलो आहोतच त्यामुळं आता मागे पडणार नाही. आणि जो वेग  चंद्रशेखर बावनकुळे यांनी पकडला आहे त्यामुळे आता  तिघे एकत्र आल्यामुळे आपण प्लसमध्येच जाणार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनीं म्हटले.

पुढे ते म्हणाले पण सगळ्यात टार्गेट जे ठरवायला लागेल ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं  ठरवायला लागेल. पुन्हा एकदा २०२४ ला मोदीजी पंतप्रधान होणं , पुन्हा एकदा २०२४ मध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार येणं. मध्ये जो खंड पडला त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले. २०१४ ते १९ काय स्पीड पकडला होता विकासाचा आपणं , पण मध्ये तीन वर्षाची गॅप पडली. सगळ्या यंत्रणा  विस्कळीत झाल्या. सगळी सिस्टीम मोडून तोडून टाकली गेली. त्या पुन्हा आपण एस्टॅब्लिश करत आहोत. २०२४ ला पुन्हा एकदा दोन्ही सरकार  येतील यासाठी आपण प्रयन्त करायला हवेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले .

Leave a comment