महाराष्ट्राच्या जनतेची सर्व संकट दूर व्हावीत… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाख्या देवीकडे मागणी

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली. सर्वाना समाधान मिळाले असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं झालय. महाराष्ट्राच्या जनतेची सर्व संकट दूर व्हावीत, असे शिंदे म्हणाले. तसेच शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सहकार्य केले तसेच त्यांचं स्वागत करणाऱ्या आसामच्या जनतेचे त्यांनी आभार मानले.

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदार त्यांच्या कुटुंबासह कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. चार महिन्यांपूर्वी शिंदे गट शिवसेनेसोबत बंडखोरीनंतर सुरत वरून गुवाहाटी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले आणि पुन्हादर्शनाला येईन असे म्हटले होते. आता मुख्यमंत्री बनल्यावर शिंदे पुन्हा देवीच्या दर्शनाला आले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तिथे त्यांच्या हस्ते पूजा देखील करण्यात आली. त्यांच्यासोबत आलेल्या आमदार आणि खासदारांनी देखील देवीचे दर्शन घेतले. आज संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट होण्याची शक्यता आहे. आज गुवाहाटीला मुक्काम केला जाणार आहे. उद्या २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा हे सर्व मुबईत दाखल होणार आहते.

Leave a comment