‘आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्रित लढल्या तरी 150 जागा येतील – प्रकाश आंबेडकर

0

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झाल्यावर एकूणच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली असली तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत मात्र जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या युतीवर एक भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले कि आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्रित लढल्या तरी १५० जागा येतील आणि आम्ही माविआ सोबत मिळून लढलो तर २०० जागा आरामात जिंकू , सी व्होटरचा सर्व्हेही तेच सांगतोय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेकर यांनी म्हटले कि, सी व्होटरच्या सर्व्हे वरून आता दोन्ही काँग्रेसने ठरवायच आपण चौघांनी एकत्र यायचं कि भांडत बसायचं ते. प्रकाश आंबेकर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले कि, शरद पवारांसोबत मतभेद मी केव्हाच सोडून दिले आहेत. माविआने सोबत जाताना माझया बाजूने तरी कोणताही किंतु परंतु नाही तसंच जेव्हा आम्ही सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच असं ठरवलंय कि एकमेकांच्या नेत्यांवर टीका टाळायची त्यामुळे आता इतर पक्षाच्या नेत्यांनी हि तारतम्य पाळावे, असे आंबेडकर यांनी म्हटले.
ईडी, सीबीआय, आयटी या तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीपोटी ५०० कोटीच्या वर मालमत्ता असलेल्या तब्बल ७ लाखाच्या कुटुंबीयांनी देश सोडल्याचे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
Leave a comment