अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो, अमृता फडणवीसांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया

0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरून केलेल्या वक्तवयावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शन करण्यात आली. या सगळ्या वातावरणात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंह कोश्यारी यांचे मराठी माणसांविषयी, मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. अनेकदा त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने आज योग  विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी त्यांना राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रश्न विचारण्यात आला , त्यावेळी त्यांनी राज्यपालांची बाजू सावरत उत्तर दिले.  महाराष्ट्रात सध्याचे राज्यपाल हे एकमेव राज्यपाल आहेत. जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकलेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. मी स्वतः अनुभवलं आहे. अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो. त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, निश्चित आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
कोश्यारी नेमकं काय म्हणाले ? 
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे कि तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटत कि जर कुणी तुम्हाला विचारलं इ तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. आंबेडकरांपासून नितीन गडकरी पर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले आहे.
Leave a comment